अलिबाग- पुण्याहून मुंबईकडे जाणारी तवेरा गाडी खोल दरीत पडून झालेल्या भीषण अपघातात चारजण ठार झाले असून चालकासह अन्य एक असे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.आज पहाटे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर खोपोली पोलिसांच्या हद्दीत आडोसी बोगद्याजवळ हा अपघात झाल्याचे खोपोली पोलिसांनी आकाशवाणीला सांगितले.सर्व मयत मुबईतील धारावीतले रहिवासी आहेत.अपघातात जखमी झालेल्यांना पुढील उपचारासाठी मुंबईस हलविण्यीत आले आहे.चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.दरीत कोसळलेली गाडी आणि मृतदेह काढण्याचे काम सुरू आहे.