गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करण्यासाठी 12 हजार कोटी रुपयांची योजना बनवण्यात आली आहे, तसेच 2018 पर्यंत संपूर्ण महामार्ग काँक्रिटचा करण्यात येईल असे गडकरी म्हणाले.
गेल्या दोन वर्षांमध्ये महामार्गावरील मृत्यूंमध्ये 4 टक्क्यांनी वाढ झाली असून हे प्रमाण कमी करणे हे आमचे मुख्य लक्ष्य असल्याचेही गडकरी म्हणाले. रस्त्यांच्या बांधकामांमध्ये असलेल्या कमतरता लक्षात आल्या असून अशा 786 जागा निश्चित करण्यात आल्याचे आणि या धोकादायक जागांचा धोका कमी करण्यासाठी 11 हजार कोटी रुपयांची योजना आखण्यात आल्याचेही ते म्हणाले.मे 2019 पूर्वी रस्त्यांवरील अपघातांची संख्या 50 टक्क्यांनी घटवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आल्याचे गडकरी म्हणाले. महामार्गांचे रुंदीकरण आणि सुरक्षेच्या उपायांमध्ये महाराष्ट्राकडे विशेष लक्ष देण्यात येईल याची हमी गडकरी यांनी दिली आहे.