मुंबई -गोवा महामार्गावर आज सकाळी माणगावजवळ झालेल्या अपघातात एक दुचाकीस्वार ठार झाला आहे.मुंबईहून गोव्याकडं जाणाऱ्या ट्रकला होव्हरटेक करीत असताना दुचाकीस्वार डाव्या बाजुच्या चाकाखाली आला.त्यात तो जागीच ठार झाला.मयत व्यक्तीचे नाव प्रवीण गजानन शेठ असून तो गोरेगावचा रहिवाशी आहे.अशी माहिती माणगाव पोलिसांनी दिली.
मुंबई-गोवा महामाार्गावर सातत्यानं होत असलेल्या अपघाताबद्दल जिल्हयात चिंता व्यक्त केली जात आहे.