मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी
गणेशोत्सव काळात मुंबई-गोवा महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 1 ते 6 सप्टेंबर या कालावधीत रात्रीच्या वेळेस अवजड वाहनाना महामार्गावर प्रवेश बंदी करण्यात आली आहे.6 ते 14 सप्टेंबर दरम्यान सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत अवजड वाहनांना महामार्ग बंद असेल शिवाय 15 आणि 16 सप्टेंबर रोजी सकाळी 8 ते रात्री 8 या काळात अवजड वाहनांना कोकणात प्रवेश करता येणार नाही.मात्र दूध,पेट्रोल,डिझेल,स्वयंपाकाचा गॅस,लिक्विड मेडिकल तसेच ऑक्सीजन आणि भाजीपाल्याची वाहतूक या बंदीतून सूट देण्यात आली आहे.या व्यवस्थेमुळे वाहतूक कोंडी टाळता येईल आणि वाहतूक सुरूळीत होण्यास मदत होईल अशी अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली आहे.गणेशोत्सव काळात चाकरमाणे मोठ्या प्रमाणात गावी जात असल्याने महामार्गावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.या कालावधीत एस.टी.महामंडळ आणि रेल्वेने अतिरिक्त वाहनांची व्यवस्था केली आहे-