मुंबई येथील टीव्हीचे पत्रकार संजय प्रसाद यांना काल गुंडांनी बेदम मारहाण केली.संजय प्रसाद आपल्या पत्नी सोबत मालाड येथील साईनाथ मार्केटमध्ये काही खरेदी करायला गेले असता एका गुंडांने अश्लील शेरेबाजी करीत त्यांच्या पत्नीची छेड काढली.प्रसाद यांनी त्याचा जाब विचारल्यानंतर गुंडबरोबर प्रसाद यांची बाचाबाची झाली.त्यानंतर त्या गुडाचे साथीदार तेथे आले.त्यांनी प्रसाद यांना बेदम मारहाण केली.जखमी अवस्थेत प्रसाद यांनी सिध्दार्थ रूग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे. सहा गुंडांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यातील विजय सिंह नावाच्या गुंडाला पोलिसांनी अटक केली आहे.