ज्येष्ठ पत्रकारांना सरकार अधिस्वीकृती पत्रिका देते.ही पत्रिका म्हणजे ज्येष्ठ पत्रकारांवर केलेला उपकार नसतो.तर त्यांनी आयुष्यभर मोठ्य निष्ठेने केलेल्या पत्रकारितेची ती पोचपावती असते.त्यामुळे ही अधिस्वीकृती पत्रिका त्यांना केवळ कर्तव्यबुध्दीने नव्हे तर सन्मानपूर्वक दिली गेली पाहिजे असे आमचे म्हणणे आहे.मराठी पत्रकार परिषदेचे कोषाध्यक्ष तथा कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर तसेच रायगडचे जिल्हा माहिती अधिकारी राजू पाटोदेकर यांनी एक चांगला पायंडा पाडत रोह्यातील ज्येष्ठ पत्रकारांना सन्मानपूर्वक अधिस्वीकृती देण्याचा उपक्रम पार पाडला आहे.या कामी उपसंचालक डॉ.गणेश मुळे यांचेही त्यांना मार्गदर्शन लाभले आहे.सर्वांचे मनापासून अभिनंदन आणि आभार.अन्य विभागात देखील असा प्रयत्न झाला तर निश्चितच ज्येष्ठ पत्रकारांना आनंद होईल.–
(Visited 137 time, 1 visit today)