दिवसभर राज्यात पत्रकारांच्या अनोख्या आंदोलनाचीच चर्चा

पत्रकारांच्या ‘मेल पाठवा” आंदोनलनास राज्यात

उदंड प्रतिसादः एस.एम.देशमुखांनी मानले आभार 

७८९ मेल पाठविले गेले,

मुंबई दि.5 (प्रतिनिधी ) “कोरोनानं मृत्युमुखी पडलेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत द्यावी आणि सर्व वयोगटातील पत्रकारांना तातडीने कोरोना लस द्यावी” या मागणीसाठी आज मराठी पत्रकार परिषदेने केलेल्या राज्यव्यापी “इ-मेल पाठवा” आंदोलनास उदंड प्रतिसाद मिळाला.मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,आरोग्य मंत्री,माहिती राज्यमंत्री,महासंचालक आदिंना 500 मेल पाठविण्याचे नियोजन होतं.प्रत्यक्षात संध्याकाळी सहा  पर्यंत ७८९  मेल पाठविले गेले. .परिषदेच्या आवाहनास राज्यातील पत्रकार ,सर्व तालुका आणि जिल्हा संघ तसेच अन्य पत्रकार संघटना आणि हितचिंतकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी एका पत्रकाव्दारे सर्वांचे आभार मानले आहेत.

गडचिरोली,चंद्रपूर,ते सावंतवाडी अशा राज्याच्या सर्वच भागातून सकाळी 6 पासूनच मेल पाठवायला सुरूवात झाली होती. जवळपास एका मिनिटाला एक मेल पडत होता.. पत्रकारांच्या आपल्या प्रश्‍नांसंबंधी किती तीव्र भावना आहेत हेच यातून दिसत होते.अनेकांना संताप व्यक्त करणारे ट्टिट देखील मुख्यमंत्री आणि अन्य मान्यवरांना केले.महाराष्ठ्रात आज सर्वत्र पत्रकारांच्या या अनोख्या आंदोलनाचीच चर्चा सुरू होती.इ-मेल आंदोलन राज्यातच नव्हे तर देशातच पहिल्यांदा झाले आणि त्याचा योग्य तो परिणाम देखील दिसून आला.जितेंंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून विषयाचं गांभीर्य त्यांच्या कानी घातलं,.  “मुख्यमंत्र्यांनी लवकरच सर्व वयोगटातील पत्रकारांना  लस देण्यात येईल असे सांगितल्याचे” ट्टिट जितेंद्र आव्हाड यांनी केले.मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील मुंबईतील पत्रकारांसाठी कोरोना लस देण्याच्या सूचना आपल्या अधिकार्‍यांना दिल्या आहेत.भाजपचे नेते आशिष शेलार आणि एनएसयुआयने ट्टिट करून पत्रकारांच्या या आंदोलनास पाठिंबा दिला आहे.”केंद्राच्या धर्तीवर राज्यातील मृत पत्रकारांच्या नातेवाईकांना सरकारने आर्थिक मदत करावी असे आवाहन आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात केलं आहे”.काही ठिकाणी सामाजिक संघटनांनी थेट आंदोलनात सहभाग नोंदविला.बीड येथे डॉ.गणेश ढवळे यांनी “पत्रकारांची सरकार उपेक्षा का करतंय’?  असा प्रश्‍न विचारत “जवाब मांगो आंदोलन” केलं..वडवणीत अनिल वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली पत्रकारांनी तहसिलदांराां मागण्याचे निवेदन दिलं,सर्वसामांन्य जनतेनं सोशल मिडियाच्या माध्यमातून जो सक्रीय आणि नैतिक पाठिंबा दिला त्याबद्दलही एस.एम.देशमुख यांनी सर्वांचे आभार मानले आहेत..

महाराष्ठ्रात गेल्या 20 फेब्रुवारी 2021 पासून 26 पत्रकारांचे निधन झाले आहे.यातील बहुतेक पत्रकार ३५ ते ५०  या वयोगटातील होते.हा तरूण पत्रकार सातत्यानं कामासाठी बाहेर फिरत असल्याने त्यांचे बाधित होण्याचे प्रमाणही जास्त आहे.मात्र या वयोगटाकडेच सरकारचे दुर्लक्ष होत आहे.त्यामुळे पत्रकारांना “फ्रन्टलाईन वर्कर” समजून सर्व वयोगटातील पत्रकारांना लस द्यावी अशी मराठी पत्रकार परिषदेची मागणी आहे.राज्यात या वयोगटातील केवळ 6 हजार पत्रकार असल्याने उत्तराखंड आणि गुजरातच्या धर्तीवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा असे परिषदेचे म्हणणे आहे.शिवाय केंद्राच्या धर्तीवर पन्नास लाख नव्हे तर किमान पाच लाख रूपयांचे आर्थिक सहाय्य तरी जे पत्रकार कोरोनानं मृत्युमुखी पडले आहेत त्याच्या कुटुंबियाना द्यावेत अशीही मागणी आहे.सरकारने आठ दिवसांत या मागण्यांच्या संदर्भात सकारात्मक निर्णय घेतला नाही तर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा इशारा पत्रकात देण्यात आला आहे.सरकाारी बातम्यांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय देखील घेतला जाऊ शकतो असेही पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे..

या पत्रकावर  मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख , विश्वस्त  किरण नाईक ( मुंबई ),अध्यक्ष गजानन नाईक,( सिन्धुदुर्ग ) कार्याध्यक्ष शरद पाबळे( पुणे ) सरचिटणीस संजीव जोशी ( पालघर )कोषाध्यक्ष  विजय जोशी,( नांदेड )  महिला संघटक जान्हवी पाटील,( रत्नागिरी )  सोशल मिडिया सेल प्रमुख बापुसाहेब गोरे (पुणे ) प्रसिध्दी प्रमुख अनिल महाजन,( बीड ) तसेच उपाध्यक्ष राजेंद्र काळे,( बुलढाणा ) यशवंत पवार,( नासिक ) शिवराज काटकर,( सांगली ) प्रमोद माने,( औरंगाबाद ) ,योगेश कोरडे ( नागपूर ) सुरेश नाईकवाडे ( परभणी )  विभागीय सचिव मन्सूरभाई ( नाशिक विभाग ) विजय मोकल ( कोकण विभाग ) बापुसाहेब गोरे ( पुणे  विभाग ) नंदकिशोर महाजन ( कोल्हापूर विभाग ) विशाल साळुंखे ( औरंगाबाद विभाग ) अविनाश भांडेकर ( गडचिरोली- नागपूर विभाग ) जगदीश राठोड ( अमरावती विभाग ) प्रकाश कांबळे (लातूर विभाग ) आदिंच्या स्वाक्षर्‍या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here