‘माज’ला मॅटची सणसणीत चपराक 

0
1715

अघिस्वीकृती समिती असो नाही तर माहिती आणि जनसंपर्कचे दैनंदिन प्रशासन असो,मनमानी करायची,कायदा आणि नियमांना हरताळ फासायचा, सारे संकेत पायदळी तुडवायाचे   आणि वरती ‘अन्याय झाला असं वाटत असेल तर जा कोर्टात’ अशी मस्तवाल भाषा वापरायची,हा दृष्टीकोन माहिती आणि जनसंपर्क विभागातील काही अधिकार्‍यांच्या चांगलाच अंगलट आला असून एक अधिकार्‍याच्या बदली प्रकरणात मॅटने कोर्टात जा म्हणणार्‍यां अधिकार्‍याच्या सणसणीत लगावली आहे याची खमंग चर्चा सध्या माहिती आणि जनसंपर्क विभागात सर्वत्र सुरू आहे.

गोविंद अहंकारी हे माहिती उपसंचालक ( वृत्त ) या पदावर मुंबईत कार्यरत आहेत.यापुर्वी त्यांची बढती अशीच मनमानी पध्दतीनं रोखली गेली होती,त्याविरोधात ते मॅटमध्ये गेले आणि त्यांना मॅटनं न्याय दिला.त्यामुळं पाच-सहा महिन्यापुर्वीच त्यांची बदली पुण्याहून मुंबईला करण्यात आली होती.बदली झाल्यानुळे त्यांनी आपलं कुटुंब मुंबईला हलविलं होतं.मुलांच्या अ‍ॅडमिशनही झाल्या होत्या.मात्र त्यांच्या नियमानसार काम करण्याचा स्वभाव काही वरिष्ठ अधिका़र्‍यांसाठी अडचणीचा होता.गोविंग अहंकारी यांच्यामुळे आपले हितसंबंध धोक्यात येऊ शकतात याची जाणीव झाल्याने  केवळ पाचच महिन्यात त्यांची बदली नाशिक विभागात उपसंचालक या पदावर केली गेली.वस्तुतः सहा महिन्यापासून नाशिक विभागाचे माहिती उपसंचालकपद रिक्त असताना एवढी तडकाफडकी बदली करण्याचे काहीच कारण नव्हते.या अन्याय्य मनमानीच्या विरोधात गोविंद अहंकारी यांनी मॅटचे दरवाजे ठोठावले आणि मॅटने बेकायदेशीर बदलीवर गंभीर ताशेरे ओढत अहंकारी यांची बदली रद्द केली आहे.बदली केवळ रद्दच केली आहे असे नव्हे तर तीन दिवसात त्यांना ते होते त्या पदावर नियुक्ती द्यावी असे आदेशही मॅटने दिले आहेत..मॅटने दिलेली मुदत कालच संपत असतानाही ऑफिस सुरू असेपर्यंत त्यांना बदली रद्दची ऑर्डर दिली गेली नव्हती.मात्र ही बाब उशिरा लक्षात आल्यानंतर रात्री आठ वाजता अहंकारी यांच्या घरी माणूस पाठवून त्यांना बदली रद्दची ऑर्डर दिली गेली.एका मस्तवाल व्यवस्थेच्या विरोधात एका अधिकार्‍याचा विजय झाला आहे.टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रफुल्ल मारपकवार यांनी यासंबंधीची सविस्तर बातमी दिली आहे.

मॅटचे ज्युडिशियल मेंबर आर बी मलिक यांनी आपल्या आदेशात राज्य सरकारच्या कार्यपध्दतीबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.इतर काही अधिकार्‍यांच्या अशाच मनमानी आणि कायदे आणि नियम खुंटीला टांगून बदल्या केल्या गेल्या आहेत ते अधिकारी देखील आता मॅटचे दरवाजे ठोठावणार असल्याचे कळते.माहिती आणि जनसंपर्क विभाग हा शासनाचा अत्यंत महत्वाचा विभाग समजला जातो.त्यामुळं बहुतेक मुख्यमंत्री हा विभाग आपल्याकडेच ठेवतात.मात्र हा विभाग आता राजकारणाचा अड्डा बनला असून काही बाह्य शक्तींची मनमानी येथे सर्रास सुरू अस्लयाने या विभागाची पत आणि प्रतिष्ठा पार रसातळाला गेली आहे.ब्रिजेशसिंग महासंचालक म्हणून आल्यानंतर काही बदल अपेक्षित होते पण तसे झालेले नाही.त्यांना वेळ नसल्याने त्यांच्या हाताखालील अधिकारी याचा गैरफायदा घेत मनमानी करीत असल्याचे अहंकारी यांच्याबदलीला ज्या पध्दतीने मॅटने स्टे दिला त्यावरून स्पष्ट झाले आहे.मुख्यमंत्र्यांनी या विभागाचे शुध्दीकऱण कऱण्याची गरज आहे.अशी चर्चा विभागात आणि पत्रकारांमध्ये सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here