मावळ मतदार संघात शांततेत मतदान सुरू

    0
    700

    मावळ मतदार संघात असलेल्या रायगड जिल्हयातील पनवेल,उरण आणि कर्जत विधानसभा मतदार संघातील 8 लाख 55 हजार 133 मतदार आपला खासदार निवडण्यासाठी आज मतदान करणार आहेत.सकाळी 7 पासून तीनही मतदार संंघात शांततेत मतदानास सुरूवात झाली आहे.रायगड पोलिसांच्या हद्दीत असलेल्या 388 केंद्रांपैकी 15 मतदान केंद्र संवेदनशील असून ति थं विशेष पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे रायगडचे पोलिस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी सांगितले.आज होत असलेल्या मतदानाच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून एक अप्पर पोलिस अधीक्षक,तीन पोलिस उपअधीक्षक पाच पोलिस निरिक्षक,590 पोलिस 200 होमगार्ड तसेच,शिघ्रकृती दलाची एक तुकडी,आणि राज्या राखीव पोलिस दलाची एक तुकडी तैनात करण्यात आल्याची माहितीही शिंदे यांनी दिली.

    दरम्यान गेल्या वेळेस मावळ मतदार संघात केवळ 44 टक्केच मतदान झाले होते या पार्श्वभूमीवर मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असल्याचे जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी सांगितले.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here