मावळमध्ये काय होणार?

0
1970

काय होणार मावळमध्ये?

मावळ आणि माढा हे दोन लोकसभा मतदार संघ सध्या चांगलेच चचेॅत आहेत. माढयातून थोरल्या पवारांची माघार आणि मावळ मधून अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांची उमेदवारी ही या चर्चेची कारणं आहेत..माढयातून माघार आणि पाथॅची उमेदवारी हे दोन्ही निण॓य पवारांना राजकीय आणि कौटुंबिक मजबुरीतून घ्यावे लागले आहेत . माढयात रणजितसिंह मोहिते पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची चचा॓ आहे. ते भाजपमध्ये गेले तर माढयातील भाजपचे तेच उमेदवार असतील अशीही अटकळ आहे..असं झालं तर माढयातील सारया शक्ती पवारांच्या विरोधात एकत्र येणार आणि पवारांची कोंडी करणार अशीही गुप्त चर्चा होती.. याची कुणकुण शरद पवार यांना लगेच लागली आणि त्यांनी माढयाला वारयावर सोडत काढता पाय घेतला..असे बोलले जाते.. राजकीय अगतिकतेतून हा निर्णय घेणे पवारांना क्रमप्राप्त ठरले..
मावळचया निर्णयामागं कौटुंबिक अगतिकता आहे.. पाथॅ पवार यांच्या उमेदवारीबद्दल शरद पवार यांनी नकार दिला होता.. मात्र कौटुंबिक दबावापुढे त्यांना निर्णय बदलावा लागला.. कायॅकतया॓ंचया आग्रहाची ढाल पुढे करीत त्यांनी नव्या पिढीला संधी दिली पाहिजे असं सांगत पाथॅ पवार यांच्या उमेदवारीस हिरवा कंदील दाखवावा लागला.पाथॅ पवार यांच्या उमेदवारीबददल बोलताना त्यांनी सुनील तटकरे आणि शेकापचे जयंत पाटील यांचा आग्रह होता हे देखील अधोरेखीत केले आहे .म्हणजे राष्ट्रवादीची सारी भिस्त या दोघांवर आहे हे उघड आहे..
अजित पवार यांना काय वाटतं? पाथॅ पवार यांना निवडणूक एवढी सोपी आहे? केवळ सुनील तटकरे आणि शेकापचे जयंत पाटील यांच्यावर भिस्त ठेऊन त्यांना ही निवडणूक जिंकता येईल? मावळ मतदार संघातील राजकीय समीकरणं एवढी सोपी नाहीत. कोकण आणि घाटाला जोडणारा मावळ मतदार संघ पुणे आणि रायगड जिल्ह्यात विभागला गेला आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ, पिंपरी आणि चिंचवड हे विधानसभा मतदार संघ आणि रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल आणि कज॓त हे मुंबईच्या जवळचे विधानसभा मतदार संघ मावळ मध्ये आहेत.. पनवेल आणि ऊरण हे विधानसभा मतदारसंघ कधीकाळे शेकापचे बालेकिल्ले नक्की होते. २००९ पय॓त पनवेलमधून सलग बारा वेळा शेकापचा उमेदवार विजयी झाला होता. २००९ मध्ये ही परंपरा खंडीत झाली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत तर पनवेल आणि उरण अशा दोन्ही ठिकाणी शेकापचा पराभव झाला.. विवेक पाटील यांच्यासारखा शेकापचा कर्तबगार नेता उरण मध्ये पराभूत झाला.. तेथे सेनेचे मनोहर भोईर विजयी झाले.. पनवेलची जागा भाजपचे प्रशांत ठाकूर यांनी जिंकली.. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये देखील शेकापला मोठा फटका बसला.. पनवेलची महापालिका एकहाती भाजपने जिंकली आणि शहरावरची पकड कायम राखली.. म्हणजे बहुतेक निवडणुकात शेकापला अपयश आले.. याचा अर्थ शेकाप संपला असा नाही. शेकापची काही मतं नक्की आहेत पण पक्षाचा उमेदवार नसताना हे मतदार कितपत उत्साह दाखवतील ते पहावे लागेल… राहिला कज॓त मतदार संघ. तो राष्ट्रवादीचे सुरेश लाड यांच्याकडं आहे.. पण येथे त्यांचीही पकड ढिली होताना दिसते आहे. कारण नुकत्याच झालेल्या कज॓त नगरपालिका निवडणुकीत त्यांना पालिका जिंकता आलेली नाही. ती सेनेच्या ताब्यात गेली आहे.. म्हणजे पक्षात सारं आलबेल नाही सुरेश लाड यांनीही अनुभवलं आहे.. घाटावरही राष्ट्रवादीचया हातून पिंपरी चिंचवड महापालिका गेलेली आहे. तेथे आज भाजपची सत्ता आहे. भाजप सेनेचेमिळून जवळपास 90 नगरसेवक तिकडे आहेत. शिवाय मावळ लोकसभा मतदार संघातील पुणे जिल्ह्यातील तीन पैकी एकही विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादीच्या ताब्यात नाही. पिंपरीत सेनेचे गौतम चाबुकस्वार आमदार आहेत, चिंचवडमध्ये भाजपचे लक्ष्मण जगताप आमदार आहेत, आणि मावळची जागा देखील भाजपकडे आहे.. म्हणजे मावळ लोकसभा मतदारसंघातील ६ पैकी ५ विधानसभा मतदार संघ भाजप – सेनेच्या ताब्यात आहेत.. दोन महापालिका देखील भाजपकडेच आहेत आणि शिवसेनेने सलग दोन वेळा मावळ लोकसभा मतदार संघावर विजय संपादन केलेला आहे. २०१४ मध्ये राष्ट्रवादीचया राहूल नावेॅकर यांना तिसरया क्रमांकाची केवळ १,८२,2९३ मतं मिळाली होती.. सेनेचे श्रीरंग बारणे ५,१२,223 मतं मिळवून विजयी झाले होते तर अपक्ष लक्ष्मण जगताप यांना ३,५४,८२० मतं मिळाली होती. या निवडणुकीत १,५७,३९४ मताधिक्य मिळून श्रीरंग बारणे विजयी झाले होते.. हे सारे आकडे आणि समीकरणे युतीच्या बाजुने जाणारी आहेत हे स्पष्ट होते..
अजित पवार यांची सारी मदार सुनील तटकरे यांच्यावर आहे.. पण ते पाथॅसाठी वेळ देऊ शकणार नाहीत. कारण र ते स्वतः रायगडमधून निवडणूक लढवत आहेत. रायगड मतदार संघ खाली दापोली आणि गुहागरपयॅत विस्तारलेला असल्याने ते आपल्याच मतदार संघात अडकून पडणार आहेत. विद्यमान खासदार शिवसेनेचे अनंत गीते यांच्याशी त्यांचा मुकाबला होणार आहे.. यावेळेस शेकाप तटकरे यांच्यासोबत असला तरी गृहकलह आणि कॉग्रेसवालयांची नाराजी त्यांना मतदार संघात जखडून टाकणार आहे. परिणामतः ते साथॅसाठी वेळ देऊ शकत नाहीत हे नक्की . जयंत पाटील फिरतील पण त्याचं कायॅक्षेत्र रायगड पुरते सीमित आहे.. त्यामुळे ही लढाई पाथॅ पवार यांच्यासाठी सोपी नाही. पवार घराण्याचा वारसा याशिवाय पाथॅ यांच्याकडे सांगण्यासारखे ही काहीच नाही. या वासतवाकडेही दुलॅक्ष करता येणार नाही.
युतीमध्ये मावळची जागा कोणाला सुटणार? शिवसेनेला की भाजपला हे अद्याप स्पष्ट नाही. परंतू तीन आमदार आणि दोन महापालिका ताब्यात असल्याने भाजपला येथून विजयाची खात्री असल्याने भाजप हा मतदार संघ घेऊन पालघर अथवा अन्य एखादा मतदार संघ सेनेला देऊ शकते. भाजपला मावळची जागा सुटली तर पाथॅसाठी मावळची लढाई अधिकच कठीण होणार हे नक्की. भाजपकडून लक्ष्मण जगताप इच्छूक आहेत. मात्र त्यांना तिकीट मिळाल्यास श्रीरंग बारणे नाराज होतील हे होणारच आहे..तरीही नवी मुंबई विमानतळ, जेएनपीटीचा विस्तार, विरार अलिबाग बहुउद्देशीय कॉरिटोर, मुंबई – गोवा महामार्गाचं चौपदरीकरण, नवी मुंबई – उरण रेल्वे मागाॅचं श्रेय घेत भाजप राष्ट्रवादीवर मात करण्याचा प्रयत्न करू शकते. समजा सेनेने मावळ वरचा हट्ट सोडला नाही तरी भाजपला एक एक जागा जिंकणे महत्वाचे असल्याने ते दगाफटका करू शकणार नाहीत. उमेदवार कोणत्याही पक्षाचा असला तरी युतीतील दोन्ही पक्ष ही लढाई जिंकण्यासाठी आणि अजित पवार यांना हरविणयासाठी नेटानं लढतील हे नक्की.. तात्पर्य पाथॅला तिकीट देणे जेवढे सोपे होते तेवढे निवडून आणणे सोपे नाही याची प्रचिती अजित पवार यांना आल्याशिवाय राहणार नाही.. थोडक्यात मावळ मध्ये पाथॅचया रूपानं अजितदादांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे हे नक्की

एस. एम देशमुख..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here