दुपारी साडेबाराच्या सुमारास मालकांचा फोन आला,देशमुख कुठं आहात? त्यांचा पृश्न। मी म्हटलं ‘दुपारी तीन वाजता प्रेस क्लबमध्ये पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीची पत्रकार परिषद आहे त्यासाठी मुंबईला निघालोय’. त्यावर ते त्राग्यानं म्हणाले,’तुम्हाला माहिती आहे ना?, ज्या पक्षाचं सरकार सत्तेवर आहे त्या विचारांच्या पेपरचे तुम्ही संपादक आहात,म्हणून ? तुम्हाला सरकारच्या विरोधात असे आंदोलन करता येणार नाही.तुम्ही परत या”.मी समजुतीच्या स्वरात म्हणालो,शेठ आंदोलन ‘कुणा सरकारच्या विरोधात नाही ही पत्रकारांच्या हक्काची लढाई आहे’ मालकांचं समाधान होत नव्हत.परत फिराचा त्यांचा हेका सुरूच होता.मी ही वैतागलो ताडकन म्हणालो,’आता पत्रकार परिषद रद्द होणार नाही,मी संध्याकाळी तुम्हाला भेटून माझा राजीनामा देतो’.त्यानुसार संध्याकाळी मी राजीनामा देऊन मोकळा झालो.लगेच चंबुगबाळं आवरून पुणं गाठलं.एक लाख रूपये पगाराची दुसरी नोकरी मी चळवळीसाठी घालविली होती.नोकरी गमविल्याची मोठी किंमत मी नंतरच्या काळात मोजली असली तरी मला दोन्ही नोकर्या गेल्याचं दुःख कधीच झालं नाही. मी निर्धाराने लढत राहिलो… चळवळ पुढे नेत राहिलो। मालकांवर दबाव आणून पत्रकारांचा आवाज बंद करण्याचा,चळवळ मोडून काढण्याचा राजकारण्यांचा आणि हितसंबंधियांचा प्रयत्न मी हाणून पाडला होता याचं समाधान आणि अभिमान मला आजही आहे.
कथा एका संघर्षाची
पृष्ठे 100 किंमत 150 रूपये
प्रसिध्दी पूर्व सवलत किंमत 100 रूपये पुस्तक मिळलविण्यासाठी सुनील वाळुंज यांच्याशी 9822195297 या क्रमांकावर संपर्क साधावा