मराठी व्याकरणाचे गाढे अभ्यासक,ज्येष्ठ समिक्षक आणि साहित्यिक प्राध्यापक माधव नारायण तथा मा.ना.आचार्य यांचे शुक्रवारी रात्री त्यांच्या चौल येथील राहत्याघरी निधन झाले.मृत्यू समयी ते 84 वर्षांचे होते.त्यांच्या मागे दोन मुले,दोन मुली,जावई-सुना असा परिवार आहे.अलिबाग येथील जनता शिक्षण मंडळाच्या महाविद्यालयात त्यांनी सलग तीस वर्षे विद्यादानाचे कार्य केले.या काळात त्यांन सत्यकथा,आलोचना,महाराष्ट्र साहित्य पत्रिका अनुष्ठुभ,अभिरूची,ललित,धर्मभास्कर आदि नियतकालिकंामधून समीक्षात्मक,आणि व्याकरण विषयक लेखन केले.अनुषंग हा त्यांचा समिक्षात्मक ग्रंथ प्रसिध्द आङे.मोरोपंत हा त्यांचा विशेष आभ्यासाचा विषय होता.मोरोपंतांबद्दल त्यांनी विपूल लेखन केले आहे.त्यांना विविध तीस पुरस्कार मिळाले होते.
त्यांच्यावर काल चौल येथे अत्यंसंस्कार कऱण्यात आले.