अनधिकृत बांधकामे,अनियंत्रित पर्यटन,कचरा व्यवस्थापनाकडे होणारे दुर्लक्ष आणि बसुमार वृक्षतोडीमुळे थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानचे सौदर्य आणि जैववैविध्य धोक्यात आल्याची तक्रार करीत बॉम्बे एन्व्हॉर्नमेंट अॅक्शन ग्रुपने राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे ‘माथेरान वाचवा’ असे अर्जव करीत दाद मागितली आहे.त्यामध्ये क्रेद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालय,महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळ,माथेरान नगरपालिका आणि रायगड जिल्हाधिकार्यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.याबाबत सर्व संबंधितांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
मात्र ही याचिका म्हणजे प्रसिध्दीचा स्टंट असून बॉम्बे एन्हॉर्न्मेंट ग्रुपचा माथेरानशी काही संबंध नाही.यापैकी काहींना इको सेन्सेटीव्ह झोनच्या मॉनिटरींग कमिटीचा मेंमर व्हायचे असल्याने ही सारी खटपट सुरू असल्याचा आरोप माथेरानचे नगरसेवक संतोष पवार यांनी केला आहे.याचिकेत करण्यात आलेले आरोप निराधार असून माथेरानच्या समस्या समजून न घेताच पर्यावरणाच्या नावाने टोहो फोडला जात असल्याचा संतोष पवार यांचा आरोप आहे.