माथेरान रोप वे ने जोडणार 

0
1185
मुंबईतील  वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी रोप वे लिंकचा एक पर्याय पुढे आला असून या नव्या वाहतूक व्यवस्थेसाठी तीन मार्ग नक्की करण्यात आले आहेत.त्यामध्ये वाशी,वाशी ते घाटकोपर या दोन पर्यायाबरोबरच माथेरान पायथा ते माथेरान या मार्गावरही रोप वे सुरू करण्याचा प्रस्ताव असून या मार्गासाठी 800 कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे.सध्या माथेरानला जाण्यासाठी मिनी ट्रेन आणि रस्ता मार्ग उपलब्ध असला तरी मिनी ट्रेन पावसाळयात चार महिने बंद असते माथेरानला जाणारा रस्ता,वळणाचां आणि धोकादायक आहे.शिवाय माथेरानमध्ये वाहनास प्रवेश ंबंदी असल्याने दस्तुरी नाका ते माथेरान हा तीन किलो मिटरचा प्रवास पायी करावा लागतो.मात्र रोप वे झाल्यास पर्यटकांना थेट गावात उतरता येणार असल्याने पर्यटक याचे स्वागत करीत असले तरी हातगाडीवाले किंवा घोड्यावाले या प्रस्तावाला विरोध करण्याची शक्यता आहे..रोप वे झाल्यास माथेरानचा पर्यटन व्यवसाय कित्येक पटीने वाढणार आहे.
(Visited 141 time, 1 visit today)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here