माथेरानहून नेरळकडे जाणार्या मिनी ट्रेनचा एक डबा आज दुपारी सव्वा तीनच्या सुमारास अमन लॉजच्या जवळ रूळावरून घसरल्याने प्रवाश्यांची मोठी गैरसोय झाली.घसरलेल्या डब्यात तीस प्रवासी होते मात्र सुदैवाने कोणालाही इजा झालेली नाही.गेल्या वर्षी देखील याच ठिकाणी डबा घसरला होता.त्या अगोदरही अनेकदा डबे घसरले असले तरी रेल्वेने प्रवाश्यांच्या सुक्षिततेच्यादृष्टीने कोणतीही उपाय योजना केली नाही..नेरळ ते माथेरान या 21 किलो मिटरच्या मार्गावर सुरू असलेली मिनी ट्रेन हे माथेरानला येणार्या पर्यटकांचे आकर्षण असते मात्र सातत्यानं होणार्या या अपघातानं मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे.होणाऱे अपघात रेल्वे वाहतुकीवर परिणाम करू शकतात अशी भिती व्यक्त केली जात आहेत.