माथेरान ट्रेनसाठी होमहवन

0
823

नेहमीच रडत -पडत चालणारी माथेरानची मिनी ट्रेन सुरळीत चालावी यासाठी नेरळमधील लोकशेडमध्ये चक्क अष्टोत्तर होमहवन क रण्यात आल्यानं सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

माथेरनला येणाऱ्या पर्यटकांसाठी मिनी ट्रेन हे आकर्षण असते.नेरळ ते माथेरान अशी 21 किलो मीटर धावणारी या रेल्वेला 2007मध्ये शंभर वर्षे पूर्ण झालीत.मात्र ही रेल्वे तोट्यात असल्यानं रेल्वेची नेहमीच उपेक्षा सुरू असते.जुन्या रेल्वे इंजिनमुळे रेल्वे मध्येच बंद पडण्याचे प्रकार वारंवार होत असतात.मागच्याच आठवड्यात रेल्वे डोगराच्या चढणीलाच बंद पडल्याने पर्यटकांचे पैसे परत करण्याची वेळे रेल्वे प्रशासनावर आली होती.रेल्वेचा टाईम-टेबल देखील पाळला जात नाही.अशा स्थितीत नवीन आणि अधिक शक्तीशाली इंजिन खरेदी करण्याऐवजी आता होमहवन केले जात असल्याने प्रवाशी आणि स्थानिकांमध्ये नाराजीची भावना व्यक्त होत आहे.सध्याच्या आधुनिक काळात होमहवन करून कसे प्रश्न सुटणार आहेत असा प्रश्न विचारला जात आहे.हा सारा प्रकार अंधश्रध्दा विरोधी कायद्याच्या अंतर्गत येतो का याची चौकशी कऱण्याची मागणी आता होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here