माथेरानमध्ये पत्रकाराच्या घरात गुंडाचा धुडगुस
बहिणीस शिविगाळ.वृध्द वडिलांना मारहाण
बहिणीस शिविगाळ.वृध्द वडिलांना मारहाण
माथेरान ः प्रतिनिधी
,माथेरानमधील पत्रकार संजय भोसले यांच्या घरी जाऊन एका गावगुंडानं भलताच धुडगुस घातला.घरातील दिव्यांग बहिणीस शिविगाळ केली आणि 83 वर्षाचे वडिल विष्णू विठोबा भोसले यांना मारहाण केली.त्यांच्या नाका-तोंडातून रक्त वहात आहे.ही घटना घडली तेव्हा पत्रकार संजय भोसले घरी नव्हते.या गावगुंडाच्या विरोधात भोसले यांनी बातम्या छापल्याच्या रागातून हा प्रकार घडल्याचे स्थानिक पत्रकारानी सांगितले.आज रात्री नऊ-साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला.
संजय भोसले हे माथेरानमधील ऑलिंपिया रेसकोर्स मैदानच्या रोडवर राहतात.जखमी विष्णू विठोबा भोसले यांनी रात्री 10.30 वाजता नगरपालिकेच्या रूग्णालायत दाखल करण्यात आले आहे.या प्रकरणाची तक्रार संजय भोसले यांनी पोलिसांत दिली असली तरी पोलिस कारवाई करायला तयार नसल्याचे स्थानिक पत्रकार पोलीस ठाण्यात बसून आहेत.माथेरान प्रेस क्लबचे अध्यक्ष अजय कदम,दत्ता शिंदे,दिनेस सुतार ही पत्रकार मंडळी ठाण मांडून आहे.परिषदेचे कोकण विभागीय चिटणीस संतोष पेरणे यांनी स्थानिक पोलीस अधिकार्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न ेकला असता ते नॉट रिचेबल आहेत,
2017 मधील पत्रकारावरील हल्ल्याची ही 56 वी घटना आहे.