खगोल अभ्यासकांना प्रवणी ठरणारे अवकाश निरिक्षण केंद्र आणि थ्री डी थिएटरचा लोकार्पण सोहळा शनिवारी माथेरान येथे होत आहे.माथेरानच्या पे मास्तर पार्कमध्ये हे निरीक्षण केंद्र उभे राहिले असून येथे ग्रह आणि तारे यांची माहिती देणारे एक प्रदर्शन कायम स्वरूपी असणार आहे.तेथून एकाच वेळी पन्नास जणांना रात्री अवकाश निरीक्षण करता येईल .थ्री डी थिएटरमध्ये ग्रहांची आणि अवकाशाची माहिती देणारी शॉर्ट फिल्म सशुल्क दाखविण्यात येणार आहे.पर्यटन स्थळावर अवकाश निरीक्षणाची व्यवस्था असणारे माथेरान गिरीस्थान हे देशातील पहिलेच पर्यटन स्थळ ठरले आहे.खगोल शास्त्राचे गाढे अभ्यासक दा.कृ.सोमण यांच्या मार्गदर्शनाखाली हे निरीक्षण केंद्र उभे राहिले आहे.