अलिबागःथंड हवेचं ठिकाण असलेल्या माथेरानमधील 428 बांधकामं 15 मार्च 2018 रोजी तोडण्याचे आदेश हरित लवादानं दिल्यानं माथेरानमध्ये खळबळ उडाली आहे.
माथेरानला 2003 मध्ये इकोसेन्सेटीव्ही झोन लागू करण्यात आला. संनियंत्रण समितीच्या पूर्व परवानगीशिवाय माथेरानमध्ये कोणतेही बांधकाम करता येत नाही.मात्र हा कायदा लागू होण्यापुर्वी येथे झोपडपट्टी अस्तित्वात असून नगरपालिकेच्या जागेवर नागरिक बांधकामं करून वास्तव्यास आहेत.तेथे दिवसेंदिवस बांधकामे वाढत असल्याचे लवादाच्या निदर्शनास आल्यानंतर लवादाने काल हा निर्णय दिला आहे.एकीकडं सरकार 2015 पर्यंतच्या अनधिकृत बांधकामांना अभय देत असताना माथेरानमध्ये मात्र हा परिसर केवळ इकोसेन्सेटीव्ह झोन असल्याचे कारण सांगून जनतेला रस्त्यावर आणले जात असल्याबद्दल मोठी नाराीजी आहे.दरम्यान इको सेन्सेटीव्ही झोन सनियंत्रण समितीची बैठक येत्या 7 एप्रिल रोजी माथेरानमध्ये होत असल्याने या बैठकीकडं स्थानिकाचे लक्ष आहे.-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here