माथेरानच्या मिनिट्रेनची चाचणी 

0
738
आठ महिन्यांपासून बंद असलेली माथेरानची मिनिट्रेन पुन्हा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली असून आज लखनौ येथील तज्ज्ञांच्या विशेष पथकाने मिनिट्रेनची चाचणी घेतली.नेरळहून माथेरानकडं डौलानं शिळ देत आलेली माथेरानची राणी पाहून माथेरानकरांनी आनंद व्यक्त केला.आणखी दोन दिवस ही चाचणी चालणार असून इंजिनची क्षमता,वेग मर्यादा तसेच चढण आदि बाबींचा विचार केला जाणार आहे.माथेरान मिनिट्रेनला एअरब्रेक इंजिन बसविण्याचा निर्णय घेतला गेला असून ते इंजिनही नेरळमध्ये दाखल झाले आहे.ही चाचणी झाल्यानंतर मध्य रेल्वेच जनरल मॅनेजर 5 फेब्रुवारीला माथेरानला भेट देणार आहेत.यामुळं येत्या पर्यटन हंगामात आपणास माथेरानची राणीचा प्रवास करता येईल अशी शक्यता निर्माण झाली आहे.–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here