नेरळकडून माथेरानकडे जाणारी मिनिट्रेन आज दुपारी दीडच्या सुमारास जुम्मा पट्टी स्थानकानजिक रूळावरून घसरली.मिनिट्रेन स्टेशनवर उभी असताना अचानक पाठीमागे गेली.सुदैवाने या अपघातात कोणालाही इजा झाली नाही.नंतर नेरळवरून इंजिनिअर्सचे पथक घटनास्थळाकडं रवाना झाले.स्थानकावर उभी असलेली मिनी ट्रेन नेमकी कश्यामुळे रूळावरून मागे सरकली आणि नंतर घसरली ते अध्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
माथेरानच्या या मिनिट्रेनला सातत्यानं छोटे-मोठे अपघात होत असले तरी त्याकडं कोणी गांभीर्यानं पाहताना दिसत नाही.