आजचा दिवस माझ्यासाठी विशेष आनंद देणारा ठरला… ठरल्या प्रमाणे आज माझ्या गावात नेत्र तपासणी
आणि मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले.. देवडी गावच्या इतिहासात असा उपक्रम प्रथमच घेतला जात असल्यानं ग्रामस्थांमध्ये विशेष कुतूहल होते.. आयोजनासाठी फारसा वेळ मिळाला नाही तरी गावातील १६० नेत्र रूग्णांनी शिबिराचा लाभ घेतला. त्यातील २६ रूग्णांना शस्त्रक्रियेची गरज होती.. पैकी १४ रूग्णांना शस्त्रक़ियेसाठी नगरला पाठविले गेले.केवळ 700 रूपयात या रूगणांवर उपचार होणार आहेत. त्यात जाण्यायेण्याचा, जेवणाचा खर्च अंतर्भूत आहे.. या सवॅ रूग्णांना पुन्हा दृष्टी लाभली तर माझा हा सारा खटाटोप साथॅकी लागला असे म्हणता येईल.. आज ज्यांची तपासणी केली गेली त्यांच्या पैकी अनेक रूग्ण असे होते की, शिबिराचे आयोजन केले गेले नसते तर त्यांना रूग्णालायात जावून तपासणी आणि उपचार घेणे शक्य नव्हतं .. एकतर गावात एस. टी नाही. सहाआसणी रिक्षानं २० किलो मिटरवर असलेल्या तालुक्याला जायचं, तेथून बीड.. हा सारा प्रवास खर्च शिवाय तेथील उपचार खच॓ न परवडणारा असतो.. त्यामुळं अनेक माता – भगिनींनी मुद्दाम भेटून आनंद व्यक्त केला आणि मला आशीर्वाद दिले ..
अथाॅत मी निमित्तमात्र होतो.. वडवणी रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष डॉ. पुरबे, विद्यमान अध्यक्ष डॉ. बोंगाणे, सचिव श्री. पतंगे यांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झालं.. परिषदेच्यावतीने अनिल वाघमारे यांनी सवॅ जबाबदारी पार पाडली.. तुळशीराम राऊत, बाबासाहेब झाटे, परमेश्वर राऊत, लक्ष्मण झाटे, गोरख पैठणे आदि गावातल्या मित्रांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.. या सवा॓चा मी आभारी आहे..
येत्या जानेवारीमधये सवॅ रोग निदान शिबीर घेण्याचा संकल्प आम्ही सोडला आहे.. त्यावेळी किमान एक हजार रूग्णांची तपासणी आणि थेट उपचार करण्याचं आम्ही ठरविलं आहे.. खेड्यामध्ये आरोग्याचे अनेक प्रश्न आहेत, स्थानिक पातळीवर उपचाराची कोणतीच साधनं नसल्यानं लोकांचे प़चंड हाल होतात.. हे मी डोळ्याने पाहिलं असल्यानं या क्षेत्रात काम करण्याची गरज आहे.. त्यामुळेच माझ्या गावात सातत्यानं असे ऊपक़म घेण्याचा माझा प़यतन असणार आहे.. (एस.एम) .