परिषदेचे बीड जिल्हा सरचिटणीस भास्कर चोपडे यांच्यावरील उपचारासाठी मराठी पत्रकार परिषदेने केलेल्या आवाहनानुसार मदतीचा ओघ सुरू झाला आहे.आज माजलगाव पत्रकार संघानं तातडीची बैठक घेऊन भास्कर चोपडे यांच्यासाठी 51 हजार रूपयांचा निधी जमा केला आहे.तसेच ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनीही व्यक्तिगत स्वरूपाची तसेच मुख्यमंत्री निधीतून मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.भास्कर चोपडे यांच्यावर औरंगाबादच्या कमलनयन बजाज रूग्णालायत उपचार सुरू आहेत.ते उपचाराला प्रतिसाद देत असल्याचे त्यांची भेट घेऊन आलेल्या सुशील कुलकर्णी यांनी सांगितले.सुशील कुलकर्णी यांनी देखील पाच हजार रूपयांची मदत चोपडे यांना दिली आहे.भास्कर चोपडे यांना मदत करण्यासाठी ज्या पध्दतीनं पत्रकार समोर येत आहेत त्याचे स्वागत केले पाहिजे असे मत एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केले आहे.–
(Visited 80 time, 1 visit today)