मांडवा ते भाऊचा धक्का या 8 नॉटिकल मैल मार्गावर बहुप्रतिक्षित अद्ययावत जलवाहतूक सेवा सुरू होण्याची शक्यता असल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील ताण बर्याच अंशी कमी होणार आहे.23 नोव्हेंबर रोजी मुंबईत मंत्रिमंडळ पायाभूत समितीच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्यची शक्यता आहे.या बैठकीत जलसेवेबरोबरच जेटीचे विस्तारीकऱण,मुंबई ट्रान्स हार्बर लिंक यासह नागपूर-मुंबई प्रस्तावित महामार्ग प्रकल्पावरही निर्णय होण्यची शक्यता आहे.मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या या बैठकीत पायाभूत प्रकल्पांबाबत निर्णय घेतले जातात.
अलिबाग येथून मुंबईला जाण्यासाठी रेवस ते भाऊचा धक्का अशी बोट सेवा सुरू आहे.परंतू परंपरागत पध्दतीच्या या सेवेमुळे वेळ लागतो.तसेच रेवस जेट्टी देखील धोकादायक झालेली असल्याने मांडवा – भाऊचा धक्का हा नवा पर्याय उपलब्ध झाल्यास त्याचा फायदा प्रवाश्यांना होणार आहे.मांडवा येथून लवकरच रो रो सेवा देखील सुरू होत असल्याने भविष्यात मांडवा हे महत्वाचे बंदर ठरणार आहे.-