नाशिक येथील सकाळचे बातमीदार महेंद्र महाजन यांना पोलिस उपायुक्त अविनाश बारगळकर यांनी बेदम मारहाण केली.नाशिकमध्ये पालकमंत्री गिरीश महाजन यांना शेतकर्यांनी अडविले याचा राग आलेल्या बारगळकडून मारहाण केली गेली.बातमी कव्हर करीत असताना पत्रकारास झालेल्या या मारहाणीचा नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ तसेच पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्यावतीने धिक्कार करण्यात येत आहे.अविनाश बारगळ यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.-