सरकारच्या विरोधा अपप्रचार केल्याच्या आरोपावरून इरानच्या मिहिला पत्रकार मर्जिए रसोली यांना पन्नास कोरडे मारण्याबरोबरच दोन वर्षाची कैदेची शिक्षा ठोठावण्यात आलीय.मज्रिएने 2012मध्ये एक सभा घेऊन या सभेत सरकार विरोधी भाषण केले होते.त्यावरून त्याना अटक केली गेली होती.मज्रिए अनेक दैनिकांसाठी सुधारणावादी लेखन करीत .तसेच सास्कृतिक बीटही त्या पहात.संगीत,कला,पुस्तक परीक्षण आदि विषयावर त्या लेखन करीत.मात्र त्या सरकार विरोधी प्रचार करतात म्हणून त्यांना अठक करण्यात आली होती.गेल्या वर्षी राष्ट्रपती बनलेले हसन रौहानी यांचा या साऱ्या घटनाक्रमामागे हात असल्याचे सांगितले जाते.