सत्ता आणि संपत्तीची नशा एकदा डोक्यात भिनली की,माणूस सारासार विवेक हरवून बसतो.तामिळनाडूच्या मंत्र्याचंही असंच झालं.एका पत्रकार महिलेशी असभ्यवर्तन करताना हा मस्तवाल मंत्री म्हणाला,तुम्ही फार सुंदर दिसता…सर्वासमक्ष घडलेला हा प्रकार कॅमेर्र्यातही कैद झाला आहे.
तमिळनाडूच्या मंत्र्यांने महिला पत्रकारासोबत असभ्य वर्तन केल्याचा प्रकार घडला आहे. तमिळनाडू राज्याचे आरोग्यमंत्री सी. विजय भास्कर महिला पत्रकाराच्या सौंदर्याचे कौतुक करताना कॅमेऱ्यात कैद झाले. एका बैठकीतून बाहेर आल्यानंतर महिला पत्रकाराने त्यांना बैठकीमध्ये कोणता निर्णय घेण्यात आला? असा प्रश्न विचारला होता. बैठकीविषयी उत्तर न देता भास्कर यांनी ‘तुम्ही सुंदर दिसता,’ असे म्हटले. हा शब्दप्रयोग त्यांनी एकदा नव्हे तर तीन वेळा केला.
एआयएडीएमकेच्या कार्यालयासमोर झालेल्या या प्रकारानंतर भास्कर यांच्यावर चोहूबाजूने टिका होत आहे. त्यांनी केलेले कृत्य अशोभनीय असल्याच्या प्रतिक्रिया देखील उमटत आहेत. महिला अधिकार संघटनेच्या कार्यकर्त्या बृंदा दिंगे यांनी आरोग्य मंत्र्यांवर सडकून टिका केली. महिला पत्रकारासोबत घडलेला प्रकार पुरुष प्रधान संस्कृतीची वृत्ती दर्शवणारा असल्याच्या त्या म्हणाल्या
सी विजय भास्कर हे तामिळनाडूचे आरोग्य मंत्री असून ते अण्णाद्रमुक पक्षाचे नेते आहेत.मला विचारलेला एक राजकीय प्रश्न टाळण्यासाठी मी तसं बोललो असं त्यांनी सांगितलं.ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर सारे पत्रकार माझे बंधू आणि भगिनी आहेत.तेव्हा मिडियानं याचा इश्यू करू नये असं सांगायलाही ते विसरले नाहीत.या प्रकाराचा पत्रकारांनी निषेध केला आहे.