महिला पत्रकारास जिवंत जाळण्याची ,बलात्काराची धमकी

0
1361

बोल ना आंटी आऊ क्या…’

गाण्यावरुन ‘पत्रकाराला धमकी

यू ट्यूबने हटवला व्हिडिओ

भाजप नेते पाशा पटेल यांनी लातूर मधील पत्रकारास दिलेल्या धमकीची घटना ताजी असतानाच आणखी एक प्रकरण समोर आलं असून बोल ना आंटी आऊ क्या या गाण्याला विरोध करणारया एका महिला पत्रकारास बलात्काराची आणि जिवंत जाळण्याची धमकी देण्यात आली आहे.या संदर्भात संबंधित महिला पत्रकाराने ओमप्रकाश मिश्रा याच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे.– सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लीक करा. –

‘बोल ना आंटी आऊ क्या…’ या गाण्याने मागच्या काही दिवसांत सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. मात्र, आता हे गाणे यू-ट्यूबवरुन हटविण्यात आले आहे. इतके लोकप्रिय गाणे यू-ट्यूबवरुन एकाएकी का काढण्यात आले, असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. याचे कारण आता स्पष्ट झाले आहे. या गाण्यातील काही शब्द आक्षेपार्ह असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. मात्र, त्यानंतर आता या वादाला वेगळेच वळण लागले आहे.

धक्कादायक! पतीला सांबार आवडलं नाही म्हणून पत्नीची आत्महत्या

‘बोल ना आंटी आऊ क्या’ गाण्याचा गायक ओम प्रकाश मिश्रा आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या विरोधात एका महिला पत्रकाराकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. ओम प्रकाश मिश्रा आणि त्याच्या सहकाऱ्यांनी आपल्याला बलात्कार करण्याची आणि जिवंत जाळण्याची धमकी दिली, असे या महिला पत्रकाराचे म्हणणे आहे. या गाण्यातील शब्द आक्षेपार्ह असल्याचे सांगत क्विंटने या गाण्याविरोधात वृत्तांकन केले होते. दरम्यानच्या काळात या गाण्याविरोधातील टीकात्मक सूर बघता युट्यूबनेही हा व्हिडिओ काढून टाकला. त्यामुळे ‘क्विंट’च्या वृत्तांकनामुळेच यूट्युबने हा व्हिडिओ काढून टाकला, असा समज ओमप्रकाश मिश्रा यांनी करून घेतला.

युट्यूबवरुन ओम प्रकाश मिश्राचा हा व्हिडिओ काढण्याआधी त्याला २८ हजार लाईक्स मिळाले होते. त्यामुळे हा व्हिडिओ युट्यूबवरून काढूनही फारसा फायदा झाला नाही. कारण त्याआधीच हा व्हिडिओ इतर साईटसवर शेअर करण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र हा व्हिड़िओ शर्मा यांच्यामुळे काढण्यात आला नव्हता. मात्र, तरीही आपल्याला धमक्या दिल्या जात असल्याचे शर्मा यांनी तक्रारीत म्हटले आहे. ‘बोल ना आंटी आऊ क्या…’ हे गाणे सध्या लोकप्रिय झाले आहे. दिल्लीतील सेंट्रल पार्कपासून जनपथापर्यंत तरुणांनी नुकतेच जोरजोरात हे गाणे गात रॅली काढली होती. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून लोक तो अतिशय आवडीने पाहत आहेत. तर दुसरीकडे या गाण्यातील शब्दांचे आक्षेपार्ह अर्थ निघत असल्याने काही जणांकडून त्याला विरोधही केला जात आहे.

‘बोल ना आंटी आऊ क्या’ म्हणणारा

ओमप्रकाश आहे तरी कोण?

‘बोल ना आंटी आऊ क्या?’ या टुक्कार गाण्यामुळे ओमप्रकाश मिश्रा हा तरूण सध्या चर्चेत आलाय. त्याचा चेहरा आपल्याला चांगालाच लक्षात आला असेल कारण त्याच्यावर वर्षभरापूर्वी तयार करण्यात आलेल्या मीम्स आणि विनोदांनी सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. दोन वर्षांपूर्वी त्याने ‘बोल ना आंटी आऊ क्या?’ या अश्लील गाण्याची निर्मिती करून ते युट्यूबवर अपलोडही केलं होतं. ढिंच्याक पूजानंतर तो सोशल मीडियाची नवी डोकेदुखी ठरला. त्याचा दोन वर्षांपूर्वीचा व्हिडिओ एका फेसबुकपेजने उकरून काढला आणि तो पुन्हा शेअर केला. बघता बघता तो हिटही झाला. व्हिडिओला युट्यूबवर व्ह्यूजही जास्त मिळाले आणि कोणाच्याही ध्यानीमनी नसलेला हा ओमप्रकाश पुन्हा चर्चेत आला.

वाचा : अवघड इंग्रजी सोपं करणाऱ्या शब्दकोशाच्या जनकाला ‘गुगल डुडल’द्वारे मानवंदना!

इंडियन ऑयडल या रिअॅलिटी शोमध्ये त्याला झळकायचं होतं. पण त्याचा आवाजच एवढा ‘सुरेल’ होता की ऑडिशनच्यावेळीच परीक्षकांनी त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर काही महिन्यांनी त्याने स्वत:चा व्हिडिओ तयार करून युट्यूबवर अपलोड केला. हा ओमप्रकाश स्वत:ला ‘रॅप किंग’ समजतो. ‘बोल ना आंटी आऊ क्या?’ या व्हिडिओला तीन कोटींहून अधिक व्ह्यूज आहेत. या व्हिडिओमध्ये त्याने वापरलेल्या शब्दांवरून आक्षेप घेत तो युट्यूबवरून हटवण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर तातडीने तो व्हिडिओ हटवण्यातही आला. हाच राग डोक्यात घालत व्हिडिओवर आक्षेप नोंदवणाऱ्या एका इंग्रजी वेब पोर्टलच्या महिला पत्रकाराला ओमप्रकाश आणि त्याच्या काही फॉलोअर्सने अश्लील मेसेजही पाठवले. एवढंच नाही तर तिला बलात्काराच्या धमक्याही दिल्या असल्याचंही समोर आलंय. संबधित महिलेने याची तक्रार केली.

लोकसत्तावरून साभार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here