युपीच्या बलरामपूर येथील एका महिला पत्रकाराशी डीस्ट्रीक मॅजिस्ट्रेट मुकेश चन्द यांनी असभ्यपणे वागल्याची तक्रार पिडित तरूण महिला पत्रकाराने केली आहे.महिला पत्रकाराने मुख्यमंत्री आणि महिला आयोगाकडे पत्राव्दारे ही लेखी तक्रार केली आहे.महिला पत्रकाराने तक्रारीत म्हटले आहे की,समाज कल्याण विभागात झालेल्या पेन्शन घोटाळ्याची माहिती घेण्यासाठी आपण डीएमच्या कार्यालयात 13 जून रोजी गेलो होतो.त्यावेळी त्यांनी असभ्य वागणूक तर दिली पण लाज वाटेल अशा शब्दाचाही वापर केल्याचे संबंधित महिल ापत्रकाराचे म्ङणणे आहे.