घटना आहे सोमवारची.मुंबईच्या परल भागातील हॉटेल अदितीमध्ये मुंबईतील इंग्रजी दैनिक मिड-डे च्या चार महिला आणि एक पुरूष पत्रकार लंचसाठी गेले होते.पत्रकारांना जागा करण्यासाठी बाजुचा टेबल किंचित सरकवा अशी विनंती वेटरने शेजाऱच्या टेबलवर बसलेल्या पाच -सहा लोाकांना केली.त्यामुळे ते चिडले.त्यांनी वेटरला आणि महिला पत्रकारांना शिविगाळ सुरूकेली.तमाशा नको म्हणून सर्व पत्रकार गप्प होते.त्यानंतरही एक व्यक्ती उठली आणि त्यांनी पत्रकारांच्या टेबलवर जाऊन तुम्हाला या शहरात जगणे दुश्वर करून टाकील अशी धमकी दिली.यानंतर पुरूष पत्रकाराने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला तर पोरींबरोबर आहेस म्हणून जास्त हिरो गिरी करू नकोस असे म्हणात त्यालाही धमकी दिली गेली.हॉटेलात नेटवर्क नसल्याने पत्रकारांना पोलिसांना बोलावता आले नाही पण नंतर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.त्यानंतर आरोपींनी सरेंडर केले.पण जेव्हा आरोपींना जमानतीवर सोडण्यात आले तेव्हा पोलिस इन्स्पेक्टर त्याना दरवाजापर्यत सोडायला आला.शेकहॅन्डही केला.ही बाब राकेश मारिया यांच्या कानावर घातल्यानंतर संबंधीत पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई कऱण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.