असं दिसतंय की, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणताही वाद न होता शांततेत पार पडावं असं महामंडळासच वाटत नसावं..नयनतारा सहगल कोण आहेत हे त्यांना आमंत्रण देताना महामंडळास माहिती नव्हतं का? सहगल या केवळ मान्यवर इंग्रजी लेखिकाच नाहीत तर त्या नेहरू – गांधी कुटुबांशी संबंधित आहेत.. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भगिनी विजयालक्षमी पंडित यांच्या कन्या आहेत.. श्रीपाद जोशी यांना हे माहित होतंच.. . तरीही उद़घाटक म्हणून श्रीमती सहगल यांना बोलावले गेले असेल तर महामंडळाचा हेतू शुध्द नव्हता हे स्पष्ट आहे.. कारण सध्याची देशातली आणि राज्यातली राजवट आणि त्यांची नेहरू – गांधी कुटुबियांबददल असलेली भूमिका हे माहिती असतानाही सहगल यांना निमंत्रण दिलं गेलं.. उदेश वाद व्हावा हाच होता हे उघड आहे. .. तसं घडलंही.. अगोदर बोलावलं आणि मग निमंत्रण रद्द केलं.. त्यातून मोठाच वाद रंगला आणि श्रीपाद जोशी वाहिन्यांवर चमकू लागले..प़करण अंगलट येतंय असं दिसताच आता हे महाशय खापर स्थानिक संयोजन समितीवर फोडायला लागले. . “नयनतारा सहगल काय बोलणार हे आम्हाला कसं माहिती”? असा बाळबोध प्रश्न उपस्थित करताना ते हे लपवू लागले की, त्याचं लिखित भाषण अगोदरच महामंडळाकडे आले होते.. ते सोशल मिडियावर ही फिरते आहे.. कदाचित हे भाषण वाचूनच श्रीपाद जोशी यांनी यू टर्न घेत निमंत्रण रद्द केले असावे, कारण त्याचे परिणाम काय होऊ शकतात याची जाणीव त्यांना झाली असावी..
अथाॅत जे झालं ते योग्य झालं नाही.. मी या सर्व प्रकाराचा निषेध करतो..विदयमान अध्यक्ष, नियोजित अध्यक्षांसह ज्यांना अभिव्यक्ती आणि विचारस्वातंत्र्यांबददल थोडी जरी आस आहे अशा सवॅ वक्त्यांनी संमेलनावर बहिष्कार टाकला पाहिजे असे मला वाटते..साहित्यिकांनी बोटचेपेपणा सोडून कधी तरी स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे..आज तशी वेळ आली आहे..