ज्येष्ठ पत्रकार आणि आमचे स्नेही अरूण खोरे लोकशाहीसाठी समंजस संवाद हे मासिक चालवतात.वेगवेगळे विषय निवडून त्यावरची सखोल माहिती देण्याचा प्रयत्न ते या अंकाच्या माध्यमातून करतात.नव-नव्या लेखकांना लिहायला सांगून वेगवेगळ्या विषयांवरील त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहचविण्याचा त्यांचा ‘खटाटोप’ स्वागतार्ह आणि अभिनंदनीय आहे.महाड येथील चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला नुकतीच 90 वर्षे झाली .त्यानिमित्तानं त्यांनी संमजस संवादचा विशेष अंक काढून या लढयाची साद्यंत हकिकत त्यामध्ये दिली आहे.राजा ढाले,यशवंत मनोहर,अरूण खोरे,विजय जाधव ,यशवंत चावरे यांच्यासह विविध मान्यवर लेखकांचे विचार या अंकात वाचायला मिळतील.महाडच्या चवदार तळ्याचा इतिहास नव्या पिढीला माहिती करून देण्याचा अरूण खोरे यांनी या अंकाच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे.मी 19 वर्षे रायगडात होतो.किती वेळा चवदार तळ्यावर गेलो असेल ते सांगता येणार नाही.महाडला गेलो की,चवदार तळ्यावर जावून डॉ.बाबासाहेबांना अभिवादन कऱणं हा नेहमीचा उपक्रम असायचा.तेथील प्रत्येक घटना,घडामोडींचा मी देखील अभ्यास केलेला असल्याने हा अंक मला विशेष भावला. अरूण खोरेजी,धन्यवाद आणि अभिनंदन.