मुंबई-गोवा महामागार्वर महाड नजिक गांधारपाले येेथे आज सकाळी साडेनऊच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात ३० प्रवासी जखमी झाले आहेत.जखमींना महाडच्या ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात अाले असून त्यातील काहींना गंभीर इजा झालेली आहे.रत्नागिरीहून मुंबईकडे जाणारी बस आणि मुंबईकडून महाडकडे जाणाऱ्या बसमध्ये धडक झाल्याने हा अपघात झाल्याचे महाड पोलिसांनी सांगितले.या अपघातामुळे मुंबई-गोवा महाागार्वरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.दोन्ही वाहने बाजुला काढली गेल्याने आता वाहतूक पुवर्पदावर आली आहे.