महाड दुर्घटनेतील दोन बसचे सांगाडे शोधून काढण्यात शोध पथकाला आज नवव्या दिवशी यश आले आहे.आज सकाळी सातच्या सुमारास पुन्हा शोध सुरू असताना घटनास्थळापासून 170 ते 200 मीटर अंतरावर अँकरला दोन बसचे सांगाडे लागले.जे सांगाडे लागले आहेत त्या दोन बस आहेत की,एकाच बसचे ते दोन सांगाडे आहेत हे ते सांगाडे वर काढल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.सांगाडे बाहेर काढण्यासाठी क्रेन मागविण्यात आल्याअसून क्रेन आल्यानंतर सांगाडे बाहेर काढण्यात येतील.बसची झालेली अवस्था बघता बसमध्ये मृतदेह असण्याची शक्यता शोध पथकाला वाटत नाही.गेल्या मंगळवारी ब्रिटिशकालिन पुल कोसळून दोन बससहा काही खासगी वाहने वाहून गेली होती.त्यात 42 प्रवासी बेपत्ता होते.त्यातील 27 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत.उर्वरित मृतदेहांचा शोध घेतला जात आहे.सतत कोसळणारा पाऊस,सावित्रीची धोका पातळी तसेच मगरींचा धोका असतानाही एनडीआरएफ,तटरक्षक दल,आणि नौदलाच्या जवानांनी ही कामगिरी पूर्ण केली आहे.दरम्यान बघ्यांची गर्दी होऊ नये म्हणून पोलिस खबरदारी घेत आहेत