मल्याळम केसरीची सणसणाटी

0
951

आरएसएसचं मल्याळम भाषेतीलमधील मुखपत्र असलेल्या मल्याळम केसरी नावाच्या मासिकात नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधी याच्या एेवजी पंडित जवाहरलाल नेहरू यांची हत्त्या करायला हवी होती असं मत व्यक्त करणारा लेख प्रसिध्द करून देशभर एकच खळबळ उडवून दिली आहे.बी.गोपालकृष्णन यांनी हा लेख लिहिला अाहे.नेहरूंबद्दल लेखात इतरही अनेक आक्षेप नोंदविण्यात आले आहेत.भाजप आणि आरएसएसने स्वतःला हे लेखकाचे मते असल्याचे सांगून स्वतःला या वादापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला असला तरी हे बी.गोपालकृष्णन लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर उभे.हे महत्वाचे आहे.काॅग्रेसने या लेखावर अपेक्षेप्रमाणे आक्षेप घेतला आहे.एेरवी मल्याळम केसरी हे मासिक कोणाला माहितही नव्हते पण या सणसणाटी लेखामुळे हे मॅगझिन प्रसिध्दीच्या झोतात आले आहे.गांधी यांच्या एेवजी नेहरूंची हत्त्या करायला हवी होती अशी मत मांडणाऱ्या केसरीनं उघडपणे हत्येचं समथर्न केलं आहे.कोणत्याही हिंसेचं किंवा हत्येचं समथर्न करणे आम्ही आक्षेपाहर् आणि निंदनीय आणि घटनाविरोधी आहे अंसं आमचं मत आहे.

मल्याळम केसरीमधला मजकूर

“जवाहलाल नेहरु यांच्यापेक्षा नथुराम गोडसे अधिक श्रेष्ठ होते. गांधीजींना आदरपूर्वक नमस्कार केल्यानंतर गोडसेंनी त्यांना गोळ्या घातल्या. पण त्याचवेळी जवाहरलाल नेहरु यांनी गांधीजींच्या समोर त्यांना आदर दिला. पण मागून पाठीत खंजीर खुपसला. नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधींनागोळ्या घालण्यापेक्षा जवाहरलाल नेहरुंना गोळ्या घातल्या असत्या तर बरं झालं असतं”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here