मला वाईट वाटतंय की,तू अजून जिवंत आहेस असा मेसेज ज्येष्ठ पत्रकार रवीशकुमार यांना पाठविणारा अखेर सापडला आहे.व्यवस्थेच्या विरोधात बोलणार्या अथवा लिहिणार्या पत्रकारांना सातत्यानं वेगवेगळ्या पध्दतीच्या त्रासांना सामोरं जावं लागत आहे.धमक्या येत आहेत.रवीशकुमार यांनाही सातत्यानं अशा धमक्या येत आहेत.त्यांनी या संबंधीची एक पोस्ट 22 सप्टेंबर रोजी आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केली.आलेल्या धमक्याचे स्क्रीन शोॅटस् देखील त्यांनी शेअर केले.त्यांनी म्हटले आहे की,आपल्याला मुद्दाम त्रास देण्यासाठी व्हॉटस अॅप ग्रुप तयार कऱण्यात आला आहे.आपण या ग्रुपमधून बाहेर पडल्यानंतर देखील पुन्हा पुन्हा आपल्याला ग्रुपमध्ये घेतले जाते आणि घाणेरडया शिव्या दिल्या जातात.मात्र आता ज्या व्हॉटस अॅप नंबर वरून रवीशकुमार यांना धमक्या दिल्या जात होत्या तो नंबर सापडला असून तो अंजनी एक्सपोर्टस या नावाने असल्याचे रवीशकुमार यांनी स्पष्ट केले आहे.गंमत अशी की,जो नंबर सापडला गेलाय त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्वीटरवर फॅोलो करतात.