मराठी पत्रकार परिषदेचे चाळीसावे अधिवेशन अनेक अर्थानी एेतिहासिक ठरले.संस्थात्मक वाढीसाठी देखील या अधिवेशनात काही महत्वाचे निर्णय घेतले गेले.विशेषतः गेली अनेक वर्षे प्रलबित असलेल्या घटनादुरूस्तीचा निर्णयही मार्गी लागला आहे.परिषदेच्या कायर्कारिणीने यापुवीर्च घटनादुरूस्ती मसुद्यास मान्यता दिली होती.त्यानंतर तो मसुदा सर्वांच्या अवलोकनाथर् परिषदेच्या कायार्लयात ठेवण्यात आला होता.परिषदेच्या सवर्साधारण सभेत त्यास मंजुरी दिल्याने आता नवीन घटना अस्तित्वात येत आहे.
नवीन घटनेत काही महत्वाच्या तरतुदी कऱण्यात आल्या आहेत.त्यानुसार राज्यातील प्रत्येक तालुका पत्रकार संघ आता थेट परिषदेशी जोडला जाणार आहे.प्रत्येक तालुक्यात पत्रकारांची संख्या पन्नासच्यावर पोहोचली आहे,अशा स्थितीत तालुका संघांची जास्त दिवस उपेक्षा कऱणं परिषदेला परवडणारं नव्हतं.यापुढे तालुका संघ हे जिल्हा संघ आणि परिषदेशीही जोडले जाणार असून यामुळे राज्यातील ३५४ तालुक्यात परिषदेचे काम थेट पोहोचणार आहे.
अनेकदा असं लक्षात आलंय की,तरूण पत्रकारांना सदस्य करून घेतले जात नाही.अनेक जिल्हा संघांमध्ये पंचवीस वषार्ंपूवीर् जी सदस्य संख्या होती तेवढीच आजही आहे.त्यामुळे परिषदेला एक साचलेपण आलंय.परिषदेचा सदस्य होता येत नाही म्हणून अनेक पत्रकार मित्र अन्य संघटनांमध्ये गेले आहेत.ही अडचण अोळखून आता परिषदेचे थेट सदस्य अशी नवी व्यवस्था करण्यात आली आहे.ज्यांना तालुका किंवा जिल्हा संघ सदस्य करून घेणार नाहीत अशा पत्रकारांना काही अटीची पुतर्ता करून थेट परिषदेचा सदस्य होता येणार आहे.
या शिवाय परिषदेच्या अगोदरच्या घटनेत विश्वस्त मंडळाची तरतूद होती.ती तरतूद नव्या घटनेतही असणार असून त्यानुसार परिषदेवर कायमस्वरूपी विश्वस्त मंडळ नेमण्याचीही व्यवस्था केली जात आहे.या शिवाय परिषदेच्या निवडणुका केवळ कायार्ध्यक्ष आणि सरचिटणीस पदासाठीच व्हायच्या.आता उपाध्यक्ष हे नवे पद तयार करण्यात आले असून कोषाध्यक्षपदासाठीही निवडणूक घेतली जाणार आहे.मात्र नवी व्यवस्था २०१५च्या निवडणुकांपासून करायची की,२०१७च्या याचा निणर्य कायर्कारिणीच्या लवकरच होणाऱ्या बैठकीत घेतला जाणार आहे.परिषदेची निवडणूूक प्रक्रिया आॅनलाईन करण्याच्या दृष्टीनं देखील व्यवस्था केली जात आहे.थोडक्यात परिषदेच्या रचनेत व्यापक बदल होत असून संस्थेच्या हिताच्यादृष्टीनं नक्कीच हे बदल उपकारक ठरणार आहेत.