मराठी पत्रकार परिषदेची स्वतःची वेगळी उत्पन्नाची साधनं नाहीत.परिषदेशी संलग्न जिल्हा संघांकडून मिळणारी संलग्नता शुल्क आणि सदस्यता शुल्क
हाच एकमेव स्त्रोत आहे.परिषदेच्या बैठकीत जमा खर्च सादर केले जातात,मात्र या बैठका नियमित होतातच असे नाही. शिवाय ही माहिती परिषदेच्या सर्व सदस्यांना मिळत नाही.त्यामुळे परिषदेच्या आर्थिक व्यवहाराबद्दल किमान वार्षिक ताळेबंद प्रसिध्द होईस्तोवर सदस्य अनभिज्ञ राहतात. हे टाळण्यासाठी आणि परिषदेचा आर्थिक व्यवहार अधिक पारदर्शक करण्यासाठी नव्या वर्षापासून दर महिन्याचा जमा खर्च मराठी पत्रकार परिषदेच्या फेसबुक पेज वर अपलोड केला जाईल.जेणे करून पेज लाईक करणार्या प्रत्येक सदस्याला महिन्यात किती खर्च झाला आणि किती शिल्लक आहे याची माहिती मिळू शकेल. परिषदेची आर्थिक स्थिती सर्व सदस्यांना कळावी या उद्देशानं हा प्रयत्न आम्ही करीत आहोत.जास्तीत जास्त सदस्यांनी मराठी पत्रकार परिषदेचे पेज लाईककरून परिषदेची आर्थिक स्थिती बरोबरच ,परिषदेचे उपक्रम,परिषदेचा पत्रव्यवहार,परिषदेचे कार्यक्रम याची माहिती जाणून घ्यावी ही विनंती. आपला आर्थिक ताळेबंद फेसबुकवर अपलोड करणारी मराठी पत्रकार परिषद ही महाराष्ट्रातील पत्रकारांची पहिली संघटना ठऱणार आहे.जानेवारीचा जमा-खर्च 31 जानेवारीला फेसबुक पेजवर अपलोड केला जाईल..
नव्या वर्षाच्या सर्व पत्रकार मित्रांना मनापासून शुभेच्छा