बाजारात मिळणारया तयार लोणच्यामुळं घरी लोणचं करणं, ते “मुरू” घालणं आणि न्याहरी बरोबर सकाळी त्याची एक “फोड” घेऊन ती किती तरी वेळ चघळत बसणं यातली रंगत संपली..
मराठवाडयात मात्र अजुनही अनेक ठिकाणी घरी लोणचं घातलं जातं.. आमच्याकडं याला “खार” म्हणतात.. हा खार घालण्यात आईचा हातखंडा.. उपवासाच्या लोणच्यापासून वेगवेगळ्या पद्धतीची तीन चार प़कारची लोणची आई करते.. आई आज थकली असली तरी खार घालणे, ताक करणे आदि कामं करणं तिला आवडतं.. .. त्यासाठी आठ दिवस तीची तयारी सुरू असते.. आंबा उतरण्या अगोदरच खाराचं साहित्य जमा केलं जातं.. खार घालण्यासाठी जुन्या पद्धतीच्या तीन चार भल्या मोठ्या बरण्या आमच्याकडं आहेत.. आंबे उतरण्याची लगबग सुरू होताच या बरण्या स्वच्छ करून तयार केल्या जातात..खाराचे आंबे फोडणारे काही “कलाकार” आजही आमच्याकडे आहेत.. ते आंब्याच्या छान फोडी करून देतात.. .. मग आई त्यात सारं साहित्य घालून ते बरणीत ठेवते.. हे सारं एखाद्या सोहळयापेक्षा कमी नसतं.. काल आईनं खार घालण्याचा सोहळा पार पाडला.. 200 आंब्यांचा खार यासाठी की, त्याचा नातेवाईकांना “वानवळा” द्यायचा असतो.. आमच्या मुलांना या खाराची चव माहिती नसली तरी हा खार माझा आवडता पदार्थ.. आईच्या हातचा हा खार मी वर्षभर चवीनं खातो.. आईच्या खाराला जी जव असते ती बाजारात मिळणारया कोणत्याही उच्च प्रतीच्या लोणच्याला असत नाही.. खार नावानं ही तोंडाला पाणी सुटतं..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here