देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल तेरा महिन्यांनी मराठवाडयातील जनता स्वंतत्र झाली.तो दिवस होता 17 सप्टेंबर 1948.हा दिवस उजाडावा यासाठी अनेकांनी आपल्या सर्वस्वाचे बलिदान दिले.अनेकांच्या घरादारावर नांगर फिरला.जुलमी निजाम आणि त्याचे लष्कर असलेल्या रझाकारांनी जो हैदोश मराठवाडयात घातला होता तो इतिहास वाचतानाही अंगावर शहारे येतात.मात्र निधडया छातीच्या आमच्या मराठवाडयातील जनतेनं ही बलाढय राजवट उलथून टाकली,आणि आम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिले.
आज मराठवाडा मुक्ती दिन आहे.महाराष्ट्रातील आणि विशेषतः मराठवाडयातील जनतेला मराठवाडा मुक्ती दिनाच्या लाख लाख शुभेच्छा