:- रायगड लोकसभा मतदार संघात येत्या 16 मे 2014 रोजी मतमोजणी होत असून मतमोजणीची संपूर्ण तयारी झाली असल्याची माहितीजिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सुमंत भांगे यांनी आज येथे बोलताना दिली.
रायगड लोकसभा मतदार संघाची मतमोजणी जिल्हा क्रिडा संकुल, नेहुली येथे होत असून मतमोजणी केंद्रातील मतमोजणी प्रक्रीयेची जिल्हाधिकारी सुमंतभांगे यांनी पाहणी करुन पूर्व तयारीचा आढावा घेतला. त्यांच्या समवेत जिल्हा पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे, उपविभागीय अधिकारी सुभाष भागडे, उपजिल्हाधिकारीबाबासाहेब पारधे यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मतमोजणी केंद्रातील मतमोजणी प्रक्रीयेचे संपूर्णत: व्हिडीओ चित्रीकरण करण्याची व्यवस्था करण्यात आली असून मतमोजणी केंद्रात आणि परिसरातसीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असल्याचे सांगून जिल्हाधिकारी सुमंत भांगे म्हणाले, मतमोजणी परिसरात पोलीस दल, एसआरपी आणि सीआरपीएफवतीने पुरेसापोलीस बंदोबस्त तैनात केला असून पार्कींगची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. पार्कींगसाठी निश्चित केलेल्या ठिकाणीच सर्वांनी आपली वाहने पार्क करावीत, असेआवाहनही श्री. भांगे यंानी केले आहे.
मतमोजणीस दिनांक 16 मे रोजी सकाळी 8 वाजता प्रत्यक्षपणे सुरुवात करण्यात येणार असून तत्पूर्वी जिल्हा क्रिडा संकुल, नेहुली येथील सुरक्षा कक्षात ठेवण्यातआलेल्या सिलबंद EVM सकाळी 7.30 वाजता मतमोजणीसाठी सुरक्षा कक्ष उघडून काढण्यात येणार आहेत. मतमोजणीच्या सुरुवातीला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडेप्राप्त झालेल्या टपाली मतपत्रिकांची मतमोजणी 3 टेबलवर प्रथम करण्यात येणार आहे. मतमोजणी प्रक्रियेसाठी पाचशेहून अधिक अधिकारी- कर्मचा-यांची नियुक्तीकेला असून त्यांना उद्या दि. 15 मे 2014 रोजी दुपारी 3 वाजता प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मतमोजणी केद्राजवळ मिडिया कक्ष सुरु करण्यात आला असून यामध्येइंटरनेट, टीव्ही, संगणक, दूरध्वनी आदीबाबींची व्यवस्था करण्यात आली आहे. रायगड लोकसभा मतदार संघातील मतमोजणीतंर्गत एका विधानसभा मतदार संघासाठी14 असे सहा विधानसभा मतदारसंघासाठी 84 टेबलवर मतमोजणी होणार आहे. एका टेबलला शिपायासह 4 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
मतमोजणी कक्षात मोबाईल, कॅमेरा, स्टिल कॅमेरा इत्यादींचा वापर करण्यास भारत निवडणूक आयोगाने प्रतिबंध केल्याने उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी,मतमोजणी प्रतिनिधी यांना मतमोजणी कक्षात मोबाईल, कॅमेरा व स्टिल कॅमेरा घेऊन जाता येणार नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सुमंत भंागे यांनी स्पष्ट