मजिठिया आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी कऱण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असले तरी पत्रकारांना कमी वेतनात राबवून घेणारे मालक यातून काही पळवाटा काढता येतात का याचा शोध घेत आहेत.त्याचाच एक भाग म्हणून बड्या वर्तमानपत्रांनी आता सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली असून या याचिकेवर उद्या 9 तारखेला सुनावणी होणार आहे.मुख्य न्यायाधीश पी.संथशिवम यांच्या अध्यक्षतेाखालील बेंच पुढे ही सुनावणी होणार आहे.रंजन गोगाई आणि शिवा किर्ती सिंह हे या बेचचे अन्य दोन सदस्य असतील.याचिका दाखल कऱणाऱ्या माध्यम समुहात आनंद बझार पत्रिका,इंडियन एक्स्पेस,इंडियन न्यूजपेपर सोसायटी,प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया,राजस्थान पत्रिका,आदिंचा समावेश आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ही पुनर्विचार याचिका उद्या दाखल करून घेतली तर श्रमिक पत्रकारांना वेतन वाढ आणि मागिल येणे रक्कम मिळण्यासाठी आणखी काही दिवस वाढ पहावी लागणार आहे.