मजिठिया आयागोच्या शिफारशींनुसार पत्रकारांना वेतनश्रेणी देण्याचे आदेश सर्वोच्चा न्यायालयाने दिल्यानंतरही अनेक वृत्तपत्रे आपल्या कर्मचाऱ्यांना मजिठिया लागू करायला तयार नाहीत.या विरोधात महाराष्ट्रात सारेच शांत असले तरी उत्तर भारतातील अनेक हिंदी,इंग्रजी दैनिकातील पत्रकार आता रस्त्यावर उतरू लागले आहेत.मजिठियाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी आता इंडियन एक्स्प्रेसचे कर्मचारी दिल्लीत आमरण उपोषणास बसले आहेत.
पत्रकारांच्या वेतन निश्चितीसाठी आतापर्यत पालेकर,बच्छावत,आणि अन्य काही आयोग नेमले गेले.प्रत्येक वेळी मालक वर्गाने त्यानुसार वेतन देण्यास टाळाटाळ केली.प्रत्येक वेळी पत्रकारांना त्यासाठी लढा द्यावा लागला.त्यावेळी पत्रकारांच्या संघटना बऱ्यापैकी सक्षम होत्या.पत्रकारांमध्येही एकजूट होती.आता तशी स्थिती राहिली नाही.त्यामुळं मजिठियाच्या अंमलबजावणीसाठी संघटीत आवाज उठताना दिसत नाही.महाराष्ट्रात तर मजिठिया द्या किंवा नक देऊ पण आम्हाला नोकरीवरून काढू नका अशीच पत्रकारांची मानसिकता झालेली आहे.इतरांच्या हक्कासाठी लढणारे पत्रकार स्वतःच्या हक्काबाबत कमालीचे उदासिन आहेत.हक्क मागायलाही ते घाबरत आहेत.