भूमाफीयांची पत्रकार सिद्धार्थ कांबळे
यांना जिवे मारण्याची धमकी
भिवंडीतील कोनगाव येथे अनधिकृतरित्या सुरू असलेल्या बांधकामाविरोधात बातमी प्रसिद्ध केली म्हणून तेथील चवताळलेल्या भूमाफीयांनी ‘इनाडू इंडिया’ या न्यूज पोर्टलचे पत्रकार सिद्धार्थ कांबळे यांना त्याच्या घरात शिरून शिवीगाळ व धक्काबुक्की केली असून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असा की, ‘इनाडू इंडिया’ या न्यूज पोर्टलचे पत्रकार सिद्धार्थ कांबळे हे भिवंडीतील कोनगाव येथे राहणारे असून त्यांच्या परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाविरोधात काही दिवसापूर्वी त्यांनी एक बातमी प्रसिद्ध केली होती.