नाग पूर ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचं गाव असलेल्या नागपूरमध्येच बुधवारी सायंकाळी एका समुहाच्या टोळक्यानं दैनिक भास्करच्या ग्रेट नागरोडवरील शङर कार्यालयावर बुघवारी सायंकाळी हल्ला चढवत फर्निचर आणि साहित्याची मोठ्या प्रमाणावर मोडतोड केली आहे. या हल्ल्यात काही पत्रकार देखील जखमी झाले आहेत.हल्लेखोरांची संख्या 50 ते 60 होती.ख्रिश्चन समाजाच्या भावना दुखविणारे वृत्त भास्करने प्रसिध्द केले असे हल्लेखोरांचे म्हणणे होते.या प्रकऱणी पोलिसात तक्रार दाखल कऱण्यात आली आहे.गेल्या दहा महिन्यात राज्यातील माध्यमाच्या कार्यालयावर झालेला हा सातवा हल्ला आहे.राज्यात आतापर्यत गेल्या दहा महिन्यात 52 पत्रकारांवर हल्ले झाले आहेत.पत्रकार संरक्षण कायदा कऱण्यास राज्य सरकार टाळाटाळ करीत असल्यामुळे पत्रकार आणि माध्यम कार्यालायवरील हल्ले वाढले असल्याचा आरोप एस.एम,देशमुख यांनी केला आङे.भास्करवरील हल्ल्याचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने निषेध केला आहे.नागपूर श्रमिक पत्रकार संघ,नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संघानेही या हल्ल्याचा निषेध केला असून हल्लेखोरांवर तातडीने कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
दरम्यान आज बीडमध्ये बोलताना पंकजा मुंडे यांनी पत्रकार संरक्षण कायदा लवकरात लवकर करण्याची ग्वाही दिली आहे.तसेच पत्रकार पेन्शनबद्दलही पाठपुरावा कऱण्याचे आश्वासन त्यांनी दिले