भारत मंगळावर

0
770

अपुरी साधनं,कमी वेळ आणि कमी पैशात भारतीय शास्त्रज्ञांनी जो भीम पराक्रम करून दाखविला आहे त्याला तोड नाही.आजवर जगात कोणालाही जमलं नाही ते पहिल्याच प्रयत्नात मंगळस्वारी यशस्वी करून दाखविण्याची कर्तबगारी भारतीय शास्त्रज्ञ आणि इस्त्रोनं करून दाखविली आहे.मंगळाचं अंतर आणि मंगळयानासाठी लागलेला खर्च बघता ऍटो रिक्षासाठी जेवढा खर्च येतो त्या पेक्षाही कमी म्हणजे जेमतेम सहा -सात रूपये प्रती किलो मिटर एवढा आला आहे..मंगळवारवर स्वारी कऱणारा भारत हा जगातील चौथा आणि आशियातील पहिला देश ठरला आहे.जे जापानला जमलं नाही,जे चीनला जमलं नाही ते भारतानं क रून दाखविलं आहे.म्हणूनच आमच्या शास्त्रज्ञांच्या या यशानं प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानानं भरून आलेली आहे.गावात पाणी नाही,अनकजण उपाशीपोटी असताना अवकाश संशोधनाची नाटकं कशाला हवीत असा प्रश्न उपस्थित करणायऱ्यांनाही इस्त्रोनं उत्तर दिलेलं आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्त्रोमध्ये उपस्थित राहून त्यांनी शास्त्रज्ञाचं अभिनंदन ही देखील महत्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे.बातमीदारच्यावतीनं आम्ही इस्त्राच्या शास्त्रज्ञाचं मनःपूर्वक अभिनंद करीत आहोत.मंगलयानाच्या रूपानं भारत मगळावर पोहोचला आहे.भारतानं एक नवा इतिहास घडविला आहे.

Dstance 68 crore KM.

Cost 454 crore Rupees.

6.67 Rupees cost per KM.

Less than Indian auto rickshaw charge per KM!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here