‘भारतमाला’मध्ये रायगडला झुकते माप,
प्रकल्प कार्यान्वित झाल्यावर जिल्हयाचा चेहरा-मोहराच बदलणार
भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काल जाहीर केलेल्या 6 लाख 92 हजार कोटी रूपयांची गुंतवणूक असलेला भारतमाला प्रकल्प जेव्हा प्रत्यक्षात येईल तेव्हा रायगड जिल्हयाचा चेहरामोहराच बदललेला असेल.कारण रायगड जिल्हा या प्रकल्पाचा राज्यातील सर्वात मोठा लाभार्थी ठरलेला आहे.
राज्यात जे 11 आर्थिक कॉरिडॉर विकसित होत आहेत त्यात 1619 किलो मिटरचा मुंबई-कन्याकुमारी कॉरिडॉरचा समावेश आहे.रायगड जिल्हयातील पनवेलपासून सुरू होणारा हा कॉरिडॉर पेण,महाड,चिपळूण,कारवार,भटकळ,
भारतमालामध्ये आंतरकॉरिडॉर आणि जे फिडर रस्ते होत आहेत,जे रिंगरोड होत आहेत त्यात रायगड जिल्हयातील पनवेलच्या रिंगरोडचा समावेश आहे.तसेच ज्या आठ शहरांमध्ये लॉजिस्टिक पार्क होत आहेत त्यात रायगडचा समावेश आहे.रायगडमध्ये हा पार्क नेमका कुठं होतोय हे स्पष्ट नसलं तरी जिल्हयात हा पार्क होत आहे.
बंदरांना जोडणारे जे रस्ते होऊ घातले आहेत त्यातही रायगडला झुकतेमाप मिळाल्याचे दिसते आहे.रायगड जिल्हयात नव्यानं विकसित होत असलेलं दिघी बंदर मोठ्या रस्त्यानं जोडलं जाणार आहे.एवढंच नव्हे तर कधीकाळी कोकणवासियांनी रेवस-रेड्डी दरम्यानच्या ज्या े सागरी महामार्गाचं स्वप्न पाहिलेलं आहे हे देखील आता पूर्ण होताना दिसत आहे.दिघी बंदरापासून सुरू होणारा सागरी मार्ग दाभोळ,गुहागर,जयगड,देवगड,मालवण,
तसेच जेएनपीटीला थेट चिंचवड आणि पुण्याला जोडलं जाणार असल्यानं कोकण आणि घाट यातील दरी आणि अंतर कमी होणार आहे.चिंचवड -जेऩपीटी मार्गावर कंटेनर टर्मिनलसाठी रस्ता,जीटीआय प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी रेल्वे मार्गावर फ्लायओव्हर आणि जेएनपीटी येथील वाय जक्शनच्या फ्लायओव्हरचा समावेश आहे.हे सारे प्रकल्प