बोला आता काय करायचं ?

0
999

पत्रकार दिनकर रायकर,अरूण साधू

दिलीप चावरे यांचा पत्रकार 

संरक्षण कायद्यास जाहीर विरोध
 पुणे जिल्हयातील आंबेपूर तालुका पत्रकार संघाच्यावतीनं आज मंचर येथे सभोवतालच्या पाच तालुक्यातील पत्रकारांसाठी कार्यशाळा आयोजित कऱण्यात आली होती.या कार्यशाळेच्या उद्घघाटन कार्यक्रमास विधानसभेचे अध्यक्ष श्री.दिलीप वळसे पाटील,ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर,अरूण साधू,दिनकर रायकर,दिनेश गुने,श्रीकांत बोजावार , दिलीप चावरे,एस.एम,देशमुख किरण नाईक उपस्थित होते.माझ्या भाषणात मी पत्रकारांना संरक्षण मिळालेच पाहिजे आणि पत्रकारांना राज्यात पेन्शन योजना लागू  केली पाहिजे हे आपले मुद्दे जोरदारपणे मांडले.त्याची कारणंही मी विस्तारानं मांडली.हे सांगताना केतकर,रायकर,अरूण साधू या ज्षेष्टांनी आमच्या चळवळीस मार्गदर्शन करावे,पाठिंबा द्यावा अशी विनंतीही केली.
दुदैर्वाने  या ज्येष्ठ पत्रकारांपैकी,दिलीप चावरे यांनी पत्रकारांच्या या दोन्ही मागण्यांना विरोध दर्शविला,अरूण साधू यांनीही विरोधाी सूर आळवला .दिनकर रायकर यांनी पत्रकार संरक्षण कायद्याला विरोध आहे मात्र पत्रकार पेन्शन योजना लागू झाली पाहिजे असे मत व्य़क्त केले .ग्रामीण भागातील पत्रकार गरीब आहेत हे मान्य नाही असेही अत्यंत धाडशी विधान त्यांनी केले. कुमार केतकर यांनी पत्रकारांच्या दोन्ही मागण्यांकडं  दुर्लक्ष करीत माध्यमं बेजबाबदार,निर्बुन्ध आणि आळशी झाली आङेत हे सांगताना त्याची काही उदाहरणं दिली.विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी तुमच्या मागण्या सरकारपर्यत पोहोचवितो असे आश्वासन दिले.सर्वच ज्येष्ठ पत्रकारांनी पत्रकारांच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष क रून पत्रकारांच्या मागण्यांबद्दल नकारात्मक सूर काढल्याबद्दल उपस्थित पत्रकारांनी तीव्र नारजी व्यक्त केली.
माझं भाषण होऊन गेल्यानंतर ज्येष्ठांची भाषणं झाल्यानं मला त्यांंंच्या वक्त व्याचा प्रतिवाद करता आला नाही पण समारोपाच्या भाषणात मी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीची भूमिका जोरदारपणे मांडताना सकाळच्या सत्रात ज्येष्ठ पत्रकारांनी उपस्थित केलेल्या मुद्यांचा विस्ताराने प्रतिवाद  केला  काही ज्येष्ठांचा कायद्याला आणि पेन्शनला विरोध असला तरी  राज्यातील 98 टक्के पत्रकारांना कायदा आणि पेन्शन पाहिजे असल्याने त्यासाठीची लढाई चालूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.दुपारच्या सत्रात खा.शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पत्रकारांच्या मागणीस पाठिंबा देत पत्रकार संरक्षण कायद्‌ायचं खासगी बिल आपण लोकसभेत मांडलं पण ते चर्चेला आल नाही असं सांगितल.आपण पुन्हा त्यासाठी प्रय़त्न कऱणार असल्याचं आश्वासनही दिलं.पत्रकार संरक्षण कायदा झालाच पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.
राज्यातील काही ज्येष्ठ पत्रकार कायद्याला विरोध करीत असल्याने सरकारला निमित्त मिळते आणि पत्रकारांमधीलच एका गटाचा कायद्याला विरोध असल्याचे कारण सांगत सरकार पळवाट शोधून काढते .कायद्याचा पाळणा हालत नाही यास जेवढे राजकारणी जबाबदार आहेत तेवढेच आपल्यातील काही मंडळीही जबाबदार आहे  हे सांगताना नक्कीच मला मानसिक क्लेश होतात.मात्र हा सारा विरोध गृहित धरून आपणास ही चळवळ पुढे न्यायची असल्याने येत्या 17 फेब्रुवारीस आपणास आपली ताकद दाखवावी लागेल.तसेच राज्यातील बहुसंख्य पत्रकार कायद्याच्या,पेन्शनच्या बाजुने आहेत हे देखील दाखवून द्यावे लागेल.
आंबेपूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष डीकेवळसे पाटील यांनी आय़ोजित केलेल्या या कार्यक्रमास दोनशेच्या जवळपास पत्रकार उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here