संजय बारू आणि पारख यांनी कॉग्रेसवर जे पुस्तक बॉम्ब टाकले आङेत त्यांनी कॉग्रेस पूर्णतः घायाळ झालीय.संजय बारू यांनी आपल्या पुस्तकात साऱ्या फाईल्स कशा 10 जनपथकडं जायच्या याची माहिती दिलीय.ती नवी नसली तरी त्यांनी घटनांची विस्तारानं माहिती दिली आहे.पारख यांनी कोळसा घोट्याळ्याचा तपशील दिल्यांनं कॉग्रेसला निवडणुकीच्या तोंडावर तोंड लपवायला जागा उरलेली नाही.
या सर्वावर पंतप्रधान कार्यालातून अगदीच कमजोर खुलासा केलाय.त्यानंतर कॉग्रेस प्रवक्तयाने बारूला भाजपचा एजन्ट म्हणत शिय्वा घातल्यात.
पारख यांंंनी आपल्या पुस्तकात म्हटलंय,कोयला घोटाळा घडला तेव्हा कोळसा मंत्रालयापेक्षा पंतप्रधान कार्यालयच जास्त ऍक्टीव्ह होते.चुकीचं होतंय हे अनेकदा पत्र पाठवून पारख यांनी मनमोहनसिंग यांना कळवलं होतं.त्याकडं लक्ष दिलं गेलं नाही.नियमांची मोडतोड होत होती,नियम बदलले जात होते आणि हे सारं पंतप्रधानांच्या मान्यतेनं आणि स्वाक्षरीसह सुरू होंतं असंही पारख यांचं म्हणणं आहे.पक्षाला थोडी जरी लाज असली तरी पंतप्रधान राजीनामा देतील अशी अपेक्षा पाऱख यांनी व्यक्त केलीय.पण असं नक्कीच होणार नाही.निवडणुका आङेत.