बीबीसी या जगविख्यात ब्रॉडकॉस्ेटिंग कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यंामध्ये कपात सुरू केलीय.बीबीसीच्या न्यूज विभागातील 415 कर्मचाऱ्यांना नारळा दिलं जाणार आहे.बीबीसीत 8400 कर्मचारी आहेत.त्यात 5000 पत्रकार आहेत.हे पत्रकार जगभरात वेगवेगळ्या देशात कार्यरत आहेत.या विरोधातआता कर्मचाऱ्यांनी 12 तासाच्या कामबंदची हाक दिलीय.यात तडजोड झाली नाही तर 23 तारखेपासून सुरू होणारय कॉमनवेल्थ गेम्सच्या प्रसारणावर परिणाम होऊ शकतो.बीबीसीमधील कर्मचारी युनियन स्टॅांग आहेत.त्यात नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट आणि बॅाडकॉस्टिंग एन्टरटेंमेंट सिनेमेटाग्राफ ऍन्ड थिएटर युनियन यांचा समावेश आहे.